top of page

Exploring Marathi and English Poetry - Purva Patankar, BhashaLab

Updated: Sep 26

कवितांचा प्रवास: मराठी आणि इंग्रजी कवितांच्या जगात


आमच्या ‘कविता’ ह्या ब्लॉग मालिकेत आपले स्वागत आहे, जिथे आपण मराठी आणि इंग्रजी कवितांच्या समृद्ध आणि भावनिक जगात प्रवास करू. प्रत्येक पोस्टमध्ये एका कवितेचा सखोल अभ्यास केला जाईल, त्यातील थीम्स, भावना आणि भाषेची सौंदर्यपूर्णता उलगडली जाईल. मराठी कवितांचे सांस्कृतिक मूळ आणि इंग्रजी कवितांचा जीवन, प्रेम, निसर्ग, आणि समाजातील विषयांवरचा जागतिक दृष्टिकोन यांचा आस्वाद घेता येईल.


Welcome to our poetry blog series where we journey through the rich and evocative world of Marathi and English poetry. Each post will take a deep dive into a single poem, exploring its themes, emotions, and linguistic beauty. Marathi poetry, with its profound cultural roots, and English poetry, with its universal appeal, offer distinct perspectives on life, love, nature, and society. This series aims to appreciate the uniqueness of each poem while drawing connections between the two languages, creating a bridge between traditions and modernity.


For further exploration, we will include detailed analyses, poet backgrounds, and even suggest other poems or collections for you to explore after each post. Keep reading and let's celebrate the art of poetry together!


कविता १ - सुगरणीचा खोपा - बहिणाबाई चौधरी 


बहिणाबाईंनी लिहलेली एक अजरामर कविता. मराठी साहित्यातील एक अद्भुत कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्म महाराष्ट्रातील असोडे (जळगाव) गावात २४ ऑगस्ट १८८० रोजी झाला. बहिणाबाई 'लेवा गण' ह्या बोलीत साहित्य रचायच्या. लेवा बोली ही खान्देशी भाषासमूहातील एक बोली आहे, जी खान्देशातील जळगाव, बऱ्हाणपूर व खान्देशला लागून असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील काही सिमांत भागात बोलली जाते. स्वतः निरक्षर असूनही बहिणाबाईंनी निसर्ग आणि रोजच्या जीवनातील अनुभवांवरुन सुंदर कविता रचल्या. 


'सुगरणीचा खोपा' हि मनुष्याला खूप सुंदर बोध देऊन जाणारी एक कविता आहे.


A unique poem written by Bahinabai. Bahinabai Chaudhary, a wonderful poetess of Marathi literature, was born on August 24, 1880 in the village of Asode (Jalgaon) in Maharashtra. Bahinabai used to compose literature in the dialect 'Lewa Gan'. Lewa dialect is a dialect of the Khandeshi language group, spoken in Jalgaon, Barhanpur in Khandesh and some marginal areas of Buldhana district adjacent to Khandesh.

Despite being illiterate herself, Bahinabai composed beautiful poems based on nature and daily life experiences.


'Sugarnicha Khopa' is a poem that gives a very beautiful message to humans.


सुगरणीचा खोपा


अरे खोप्यामधी खोपा

सुगरणीचा चांगला

देखा पिलासाठी तिनं

झोका झाडाले टांगला ||१||


पिलं निजली खोप्यात

जसा झुलता बंगला

तिचा पिलामध्ये जीव

जीव झाडाले टांगला ||२||


खोपा इनला इनला

जसा गिलक्याचा कोसा

पाखराची कारागिरी

जरा देख रे माणसा ||३||


तिची उलीशीच चोच

तेच दात, तेच ओठ

तुला देले रे देवान

दोन हात दहा बोटं ||४||


कठीण शब्द


खोपा - घरटे (nest) 

निजली - झोपली (slept)

इनला - छोटासा (tiny)

गिलक्याचा कोस - सुकलेले घोसाळे (ridge gourd)

उलीशी - इवलीशी/छोटीशी (tiny)


कवितेचा भावार्थ:



कवितेची सुरुवात बहिणाबाई सुगरणीच्या घरट्याच्या प्रशंसेसोबत करतात. त्या म्हणतात की सगळ्या घरट्यांमध्ये सुगरणीचे घरटे सर्वात सुंदर असते. स्वतःच्या पिल्लांसाठी ती ते झोक्यासारखे दिसणारे घरटे उंच झाडाला टांगून ठेवते. तिच्या पिल्लांसाठी ते घरटे एखाद्या झुलणाऱ्या बंगल्यासारखे असते आणि पिल्ले त्यामध्ये निर्धास्त होऊन झोपतात. पिल्ले निर्धास्त असतात कारण सुगरण स्वतःचा जीव टांगणीला लाऊन त्यांचे रक्षण करत असते.     


कवितेत पुढे बहिणाबाई त्या खोप्याची तुलना सुकलेल्या गिलक्याशी, म्हणजेच घोसाळीशी करतात आणि म्हणतात की त्या खोप्याचे सौंदर्य काही वेगळच आहे. स्वतःला श्रेष्ठ मानणाऱ्या मानवाला आवाहन दिल्यासारखं त्या म्हणतात की त्या इवल्याश्या पक्ष्याची कारागिरी पाहून माणसाला हेवा वाटला पाहिजे.


कवितेच्या शेवटच्या ओळी, "तिची उलीशीच चोच, तेच दात, तेच ओठ, तुला देले रे देवान, दोन हात दहा बोटं" फार खोल आणि गहन विषय मांडून जातात. बहिणाबाई म्हणतात की इतक्या लहानश्या जिवाकडून जर इतकी सुंदर निर्मिती होऊ शकते, तर माणसाला देवाने बरेचकाही दिले आहे, त्याचे आपण काही करतोय का? इतकी क्षमता आणि इतक्या सोइ-सुविधा असून, माणूस त्याचं काय करतोय? थोडं पुढे जाऊन असा देखील विचार करूया की देवाने एवढं दिलेलं असतानाही आपण बरेचदा असंतुष्ट असतो. 


बहिणाबाई ह्या कवितेतून निसर्गाच्या देणगीचे महत्व सांगतात व असं सुचवतात की माणसाला त्याचा गर्विष्ठपणा सोडून निसर्गातील इतर घटकांपासून, ते कितीही क्षुल्लक वाटत असले तरी, बरेच काही शिकता येईल.


Poem’s interpretation:


The poem begins with Bahinabai praising the weaver bird's nest, calling it the most beautiful among all nests. The weaver bird creates a swing-like nest for her young ones, hung high on a tree. For the young ones, the nest is like a swinging bungalow, where they sleep peacefully, assured of safety as the mother protects them with her life.


Bahinabai compares the nest to dried ridge gourd and encourages humans to admire the bird's craftsmanship. In the last lines, she questions whether humans, blessed with so much by God, are making good use of their abilities, suggesting that even small creatures like birds create wonders, while humans should learn from nature instead of being arrogant.


एक विचारू का?


ही कविता वाचून तुम्हाला सुगरण पक्ष्याच्या उदाहरणासारखे निसर्गातील दुसरे कुठले उदाहरण आठवते का?  


A question for you..


After reading this poem, can you think of another example from nature, similar to the weaver bird?"


Transliteration:


Sugaranicha Khopa


Are khopyamadhi khopa

Sugaranicha changala

Dekha pilasathi tina

Jhoka jhadale tangala


Pila nijali khopyat

Jasa jhulta bangla

Ticha pila madhye jiv

Jiv jhadale tangala


Khopa inla inla

Jasa gilkyacha kosa

Pakharachi karagiri

Jara dekh re mansa


Tichi ulishich choch

Tech dat, tech oth

Tula dele re devan

Don hat daha bota


END


Listen to the poem and analysis:



🔗 Connect with BhashaLab:









📞 Contact: +91 86577 20901, +91 97021 12044

1 Comment


Your article is very informative and easy to read. For those looking for quality education options, exploring the best international schools in mumbai is definitely worth considering.

Like
bottom of page