top of page

    Nouns - 1 (Proper, Common, Abstract, Concrete, Countable, Uncountable) - English : Marathi

    What is a Noun?

    • English: A noun is a word that names a person, place, thing, or idea.

    • Marathi: नाम म्हणजे व्यक्ती, स्थळ, वस्तू किंवा कल्पनेचे नाव दर्शवणारे शब्द.

    Watch the Marathi explainer video:

    1. Proper Noun

    Definition : Names of specific people, places, or things. Always starts with a capital letter.

    मराठीत: विशिष्ट व्यक्ती, स्थळं, संस्था, गोष्टी यांची नावं. या नावांची सुरुवात मोठ्या (capital) अक्षराने होते.

    स्पष्टीकरण: Proper noun म्हणजे नेमकं कोणाचं तरी खास नाव.जसं ‘मुलगा’ हे सर्वसाधारण नाव आहे, पण ‘राज’ हे त्या मुलाचं खास नाव आहे.‘राम’, ‘सीता’, ‘मुंबई’, ‘भारत’ - ही सगळी Proper Nouns आहेत कारण ती विशिष्ट लोकं किंवा ठिकाणं दर्शवतात.

    Examples:

    1. Sachin Tendulkar is a famous cricketer. Sachin Tendulkar.  हा एक प्रसिद्ध क्रिकेटपटू आहे.

    2. The Ganga is a holy river. The Ganga ही एक पवित्र नदी आहे.

    2. Common Noun

    Definition: A general name for a person, place, or thing.

    मराठीत: व्यक्ती, स्थळ, वस्तू, प्राणी यांची सर्वसामान्य नावं.

    स्पष्टीकरण: Common noun म्हणजे कोणत्याही वस्तू, प्राणी, व्यक्ती यांचं सामान्य नाव.उदाहरणार्थ, ‘city’ म्हणजे कुठलंही शहर, ‘girl’ म्हणजे कुठलीही मुलगी - ह्यांना खास नाव नाही.‘पुस्तक’, ‘शहर’, ‘मुलगा’ - ही सगळी Common Nouns आहेत.

    Examples:

    1. The boy is reading a book. मुलगा पुस्तक वाचत आहे.

    2. Dogs are loyal animals. कुत्रे हे विश्वासू प्राणी असतात.

    3. Abstract Noun

    Definition: Names an idea, quality, or feeling that cannot be seen or touched.

    मराठीत: भावना, गुणधर्म किंवा स्थिती जी केवळ अनुभवता येते.

    सोपं स्पष्टीकरण: Abstract noun म्हणजे जी गोष्ट फक्त मनाने समजते – पाहता, स्पर्श करता येत नाही.जसं ‘प्रेम’, ‘सौंदर्य’, ‘धैर्य’, ‘प्रामाणिकपणा’ — या भावना आहेत.या गोष्टी मोजता येत नाहीत, पण अनुभवता येतात.

    Examples:

    1. Honesty is the best policy. प्रामाणिकपणा ही सर्वोत्तम नीती आहे.

    2. She showed great courage in danger. संकटात तिने मोठं धैर्य दाखवलं.

    4. Concrete Noun

    Definition: Things that can be seen, touched, heard, or smelled.

    मराठीत: ज्या गोष्टी दिसतात किंवा ज्या आपण प्रत्यक्ष अनुभवू शकतो.

    सोपं स्पष्टीकरण: Concrete noun म्हणजे दिसणाऱ्या आणि हाताळता येणाऱ्या गोष्टी.उदाहरणार्थ, ‘पेन’, ‘टेबल’, ‘मांजर’, ‘फळ’ - या वस्तू दिसतात आणि हातात घेता येतात.अशा नावांना Concrete Nouns म्हणतात.

    Examples:

    1. The cat is sitting on the table. मांजर टेबलवर बसलं आहे.

    2. I heard a loud noise from the street. मला रस्त्यावरून मोठा आवाज ऐकू आला.

    5. Countable Noun

    Definition: Nouns that can be counted.

    मराठीत: ज्या वस्तू किंवा गोष्टी आपण मोजू शकतो.

    सोपं स्पष्टीकरण: Countable noun म्हणजे जी वस्तू आपण एक, दोन, तीन अशा पद्धतीने मोजू शकतो.उदाहरणार्थ, ‘एक पुस्तक’, ‘तीन पेन’, ‘चार मुले’ — या सगळ्या गोष्टी मोजता येतात, म्हणून त्या Countable Nouns आहेत.

    Examples:

    1. I have three pens in my bag. माझ्या बॅगेत तीन पेन आहेत.

    2. There is one apple on the plate. ताटात एक सफरचंद आहे.

    6. Uncountable Noun

    Definition: Nouns that cannot be counted individually.

    मराठीत: ज्या गोष्टी मोजता येत नाहीत, फक्त मोजमापाने वापरल्या जातात.

    सोपं स्पष्टीकरण: Uncountable noun म्हणजे ज्या गोष्टींचं मोजमाप करता येतं पण मोजता येत नाही.उदाहरणार्थ, ‘पाणी’, ‘दूध’, ‘साखर’, ‘माहिती’ — आपण हे किलो, लिटर, चमचा अशा मापात मोजतो, पण एक, दोन, तीन अशा पद्धतीने नाही.

    Examples:

    1. Please give me some water. कृपया मला थोडं पाणी द्या.

    2. Information is important for the exam. परीक्षेसाठी माहिती महत्त्वाची आहे.


    Common Confusions - सामान्य गैरसमज


    1. Can a noun be both countable and concrete?

    Yes! Most everyday things like apple, pen, or book are both countable and concrete — they can be counted and touched. हो! सफरचंद, पेन, पुस्तक अशा वस्तू मोजता येतात आणि स्पर्श करता येतात. त्यामुळे त्या countable आणि concrete दोन्ही असतात.

    2. Can a noun be uncountable and concrete at the same time?

    Yes. Water, sugar, and rice are examples — they are real, touchable things, but we don’t count them one by one. हो! पाणी, साखर, तांदूळ हे प्रत्यक्षात दिसतात व हाताळता येतात, पण मोजता येत नाहीत — म्हणून ते uncountable आणि concrete असतात.

    3. Is every proper noun also a concrete noun?

    Mostly yes — Ravi, India, Taj Mahal are all specific and real. But not always. Monday, January, or Happiness as names (in poetry or personification) can be proper but abstract. बहुतांश वेळा हो — रवि, मुंबई ही नावे खास व प्रत्यक्ष असतात. पण कधी कधी Monday, January ही नावे काळाचे नाम (abstract) रूपही असतात.

    4. Can an abstract noun ever become countable?

    No. Abstract nouns like love, anger, truth are always uncountable — you can feel them, but not count them. नाही. प्रेम, राग, सत्य या गोष्टी आपण फक्त अनुभवतो. त्या मोजता येत नाहीत, त्यामुळे त्या नेहमीच uncountable असतात.

    1. Is “mango” a proper noun?

    No. Mango is a common noun. It refers to any mango in general, not one specific name. If you say Alphonso or Kesar, that is a proper noun - because it is the name of a specific type of mango. नाही. Mango (आंबा) हे सर्वसामान्य फळ आहे, त्यामुळे ते common noun आहे. पण जर आपण हापूस, लंगडा अशा विशिष्ट प्रकाराचा उल्लेख केला, तर ते proper noun ठरेल.

    Examples:

    • I ate a sweet mango. ✅ → Common Noun

    • Alphonso mangoes are famous in Maharashtra. ✅ → Proper Noun

    About BhashaLab


    BhashaLab is a dynamic platform dedicated to the exploration and mastery of languages - operating both online and offline. Aligned with the National Education Policy (NEP) 2020 and the National Credit Framework (NCrF), we offer language education that emphasizes measurable learning outcomes and recognized, transferable credits.


    We offer:

    1. NEP alligned offline language courses for degree colleges - English, Sanskrit, Marathi and Hindi

    2. NEP alligned offline language courses for schools - English, Sanskrit, Marathi and Hindi

    3. Std VIII, IX and X - English and Sanskrit Curriculum Tuitions - All boards

    4. International English Olympiad Tuitions - All classes

    5. Basic and Advanced English Grammar - Offline and Online - Class 3 and above

    6. English Communication Skills for working professionals, adults and students - Offline and Online


    Contact: +91 86577 20901, +91 97021 12044


    Comments


    bottom of page